परभणी, दि. १५ (प्रतिनिधी ): राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे सोमवार, (दि.१६) रोजी परभणी जिल्हा दौ-यावर येत आहेत.
मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड हे सोमवारी सकाळी ९:३० वाजता नांदेड येथून शासकीय वाहनाने गंगाखेड (जि. परभणी) कडे प्रयाण करतील. सकाळी १०:१५ वाजता गंगाखेड येथील संदीप राठोड यांच्या घरी धावती भेट देतील. त्यानंतर गंगाखेड येथील क्रिकेट मैदान, गोदावरी तांडा येथे आयोजित ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र -२०२३ या कार्यक्रमास उपस्थित राहून संबोधित करतील.
त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांची वेळ राखीव राहील. जलसंधारण मंत्री संजय राठोड हे दुपारी ३ वाजता शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील.