परभणी, दि.१५ (प्रतिनिधी ): राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे उद्या सोमवार, (दि.१६) रोजी सकाळी १०.४५ वाजता नांदेड येथून गंगाखेडकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांचे दुपारी १२ वाजता गंगाखेड येथील गोदावरी तांडा येथे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र -२०२३ या कार्यक्रमास उपस्थित राहतील.
त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांची वेळ राखीव राहील. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे दुपारी ३ वाजता शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील.