आपला जिल्हा

उद्या उपविभागीय कार्यालया समोर ओबीसी समाजाचे “धरणे आंदोलन”

⬛ ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे आणि ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवणे या मुख्य मागण्या

सेलू ( प्रतिनिधी ) 16 ऑक्टोंबर रोजी ओबीसी समाजाच्या वतीने सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत “धरणे आंदोलन” करण्यात येणार आहे. 

 

सेलू तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने रविवार दि.8 ऑक्टोबर रोजी सेलू शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत सकल ओबीसीं समाजाच्या वतीने खालील मागण्या संदर्भात आंदोलन छेडले जाणार आहे.

1) ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे 2) ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवणे 3) भारतीय संसदेमध्ये 33% महिलांना देण्यात आलेल्या आरक्षणात ओबीसी महिलांना राखीव जागा देण्यात याव्यात. 4) मंडल आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करणे व ओबीसी समाजाच्या इतर मागण्यांवर लोकशाही मार्गाने आंदोलन होणार असल्याची माहिती सकल ओबीसी समाज सेलू तालुक्याच्या वतीने देण्यात आली.

या धरणे आंदोलनासाठी सकाळी 10 ते दुपारी तीन वाजेपर्यंत सेलू तालुक्यातील जास्तीत जास्त ओबीसी बांधवानी आपल्या न्याय हक्कासाठी उपस्तित राहावे असे आवाहन नानासाहेब राऊत माजी जि. प. सदस्य , गणेश आण्णा नाईकवाडे, प्रकाश मुळे उपसभापती कृ. बा. स. सेलू, प्रा. विठ्ठल तळेकर, ॲड विष्णू ढोले, प्रा. महेमुद सर, भागवत दळवे, मनोज गोरे, ॲड प्रभाकर गिराम, महादेव गायके, ॲड शिवाजी चौरे, प्रभाकर इंगळे, पवन कटारे, दामोधर दळवे, शामराव कटारे, विनोद तरटे, भारत इंद्रोके, किशोर कारके, माऊली राऊत, बाळासाहेब काजळे, योगेश कथले, सोमेश्वर गिराम, गजानन घुगे, रमेश गोरे, बाळू प्रधान, ॲड गोपाळ बोकन, रामजी गडदे, सुदाम रोकडे, प्रल्हाद गोरे, दत्ता श्रावणे, संतोष कटारे, रवी कटारे, विठ्ठल कोक्कर, अशोक खताळ, विठ्ठल राऊत, माऊली थोरात आदीसह ओबीसी समाज बांधवानी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!