आपला जिल्हा

श्रीराम प्रतिष्ठान आयोजित गरबा प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद.

महिलांनी उपजत कलागुणांना वाव द्यावा - डॉ सविता रोडगे

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व क्युरिअस किड्स आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त तीन दिवसीय गरबा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन (ता. ७) वार शनिवार रोजी साईबाबा मंदिर येथे पार पडला.

या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ. बबिता ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, गरबा प्रशिक्षणाच्या आयोजक तथा संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, सौ. पौर्णिमा जोहिरे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. वनिता चाफेकर भाजपा महिला शहराध्यक्षा सौ. रुपा ठाकुर, श्रीमती राजुरकर, गरबा प्रशिक्षक गितांजली घाणेलु, सौ. वैशाली साबळे, सौ. मिनाक्षी रत्नपारखी, सौ. शालिनी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सेलू शहरातील महिला व मुलींकरिता खास गरबा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठानने केले. प्रशिक्षण शिबिरामध्ये सॅनेडो, डाकला दांडिया, गरबा फ्यूजन रास आदी डान्स प्रकार शिकविण्याकरिता मुंबई येथील कलांजली नृत्य इन्स्टिट्यूट च्या संचालिका गीतांजली घाणेलु या उपस्थित आहेत. येथे जमलेल्या सर्व मुली व महिलांनी आपल्यातील उपजत कलागुणांना वाव दिला पाहिजे. या उद्देशानेच श्रीराम प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करते. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील श्रीराम प्रतिष्ठानने अनेक उपक्रम राबविले आहेत. सर्व महिलांनी गरबा प्रशिक्षण शिबीर चा मनमुराद आनंद घेत सर्व कलाप्रकार शिकावेत. व येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये उत्कृष्ट प्रकारे सर्व कलाप्रकारासह दांडिया खेळाव्यात. त्याचबरोबर लवकरच श्रीराम प्रतिष्ठान तर्फे दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. असे बोलतांना डॉ. सविता रोडगे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले तर आभार निशा तोष्णीवाल, स्मिता शर्मा यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!