आपला जिल्हा

निर्भय बनो विषयावर सेलू येथे डाॅ. विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान

सेलू :- ( प्रतिनिधी ) देशातील व राज्यातील वर्तमान राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने संविधान बचाव समिती सेलू तर्फे जनजागृतीच्या उद्देशाने सेलू तालुक्याचे भुमिपुत्र, पर्यावरणतज्ञ, विचारवंत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रख्यात व्याख्याते डाॅ. विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता साई नाट्यगृह, महेश नगर सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण शेरे पाटिल तर स्वागताध्यक्ष म्हणुन शेख महेमुद सर हे असणार आहेत. लोकशाही व संविधान रक्षणाच्या उद्देशाने आयोजित या व्याख्यानास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने दत्तूसिंग ठाकूर, जाहेद घौरी, प्रा.के.डी.वाघमारे, ॲड. विष्णु ढोले, सुनिल गायकवाड, श्रीनिवास उघडे, रामेश्वर पौळ, शेख साजीद, अमजद बागवान सतीश जाधव सह संविधान बचाव समिती सेलू तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!