आपला जिल्हा

अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश ठाकूर मित्र मंडळातर्फे  101 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सेलू (प्रतिनिधी ) सेलू येथील न्यू हायस्कूल  येथे मा.सभापती अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्चाला फाटा देत नागेश ठाकूर मित्रपरिवार तर्फे 101 गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष  अशोक काकडे, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश काटकर, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ गोळेगावकर सर, शहराध्यक्ष भाजपा अशोक शेलार, सामाजिक कार्यकर्त्या प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप रूपाली ठाकूर, ललिताताई गिल्डा, अँड कृष्णा शेरे, मुख्याध्यापक श्री भागवत सर, कृष्णा गायकवाड, अभिजीत राजुरकर, प्रशांत ठाकूर, इंद्रजीत ठाकूर आधी प्रमुख पाहुणे उपस्थित होते

कार्यकर्माचे सूत्रसंचालन  गाडेकर सर
यांनी केले , विद्यार्थ्यांना मनोगत मार्गदर्शन अशोक काकडे, ललिता गिल्डा मॅडम, भागवत सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागेश ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी साठी नागेश ठाकूर मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले..

Related Articles

Back to top button
Don`t copy text!