आपला जिल्हा

सेलूत शासनाच्या खाजगीकरण आणि कंत्राटी धोरणाविरोधात बैठक

सेलू ( प्रतिनिधी ) दि 1 ऑक्टोबर रविवार रोजी सेलूत शासनाच्या खाजगीकरण आणि कंत्राटी धोरणाविरोधात बैठक
हुतात्मा स्मारक सेलू येथे बहुजन विचार मंचाच्या वतीने एक बैठक सम्पन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भन्ते संघरत्नजी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्रवन महाविहार देवागावं फाटा ता सेलू हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ वाघमारे यांनी केले.शासनाच्या खाजगीकरण आणि कंत्राटी धोरणाविरोधात अनेकांनी आपले मत मांडले.यात धनंजय भागवत,सर्जेराव लहाने, शेख महेमूद, विष्णू ढोले यांनी विचार मांडून शासनाच्या धोरणाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालूका संघटक सुनील गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ काशिनाथ पल्लेवाड यांनी केले तर प्रा के डी वाघमारे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!