आपला जिल्हा

ओबीसी बहुल भागात जानकर बाजी मारणार?

परभणी लोकसभा निवडणूकिसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर उतरणार मैदानात

परभणी ( प्रतिनिधी ) मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष आणि शासनाच्या ओबीसी बाबतीत घेत असलेल्या निर्णयामुळे बहुसंख्य ओबीसीच्या मनात पसरलेली अशांतता पाहता राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी हेच गणित ओळखून परभणी लोकसभा निवडणूकिसाठी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या ठिकाणी आपला एक आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद अधिक असल्यामुळे आपण या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून ती निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांच्याकडून दिली जात आहे.

या सर्व प्रकारमुळे परभणी लोकसभा
मतदारसंघाचे गणिते बिघडणार की काय अशी शंका मात्तबर राजकारण्याकडून वर्तवली जात आहे.परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हटकर, धनगर, माळी, वंजारी मायक्रो ओबीसी यांच्यासह अनुसूचित जाती यांचे मिळून जवळपास १५ लाख मतदान आहे. यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताब्यात आहेत.
त्या मुळे जानकर ओबीसी बहुल भागात बाजी मारणार का? या चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!