आपला जिल्हा

जिंतूर विधानसभा महाविकास आघाडीला धक्का… शिवसेना उबाठा गटाच्या साडेगावकर यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

⬛आज वंचित बहुजन आघाडीत सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत वालूर येथे भव्य पक्ष प्रवेश

सेलू ( प्रतिनिधी ) शिवसेना (ऊ. बा.ठा) जिल्हाप्रमुख संजय नारायणराव साडेगांवकर यांनी प्रचाराच्या धामधूमीत आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीला धक्का देत आज वंचित बहुजन आघाडीत सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्या सोबत भव्य पक्ष प्रवेश करणार आहेत.

त्यांनी संजयजी जाधव साहेब शिवसेना (ऊ. बा.ठा) उपनेते तथा खासदार परभणी लोकसभा यांना दि 10 नोव्हेंबर रविवार रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात मी संजय नारायणराव साडेगांवकर शिवसेना (ऊ. बा.ठा) जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत आहे, तरि काही कारणास्तव माझी पक्षात काम करण्याची ईच्छा नसल्या कारणाने मी स्वः खुशीने कोणावरही उजर न ठेवता सदरिल पदाचा राजीनामा देत आहे.

तरि आपण माझा राजीनामा स्विकारुन मला पदावरुन कार्यमुक्त करावे हि विनंती.

साडेगावकर यांच्या राजीनाम्याने सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी यांना धक्का मानला जात असून साडेगावकर आता यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केल्यास मतदार संघातील गणिते काय होतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
साडेगावकर हे जिल्हा परिषद परभणी आरोग्य व शिक्षण सभापती होते तर वालूर ग्रामपंचायत खूप काळापासून त्यांनी सरपंच पद आपल्याकडे ठेवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!