सेलू प्रतिनिधी (ता.25) रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित,आदित्य इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी येथे जागतिक औषधनिर्माता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे आधारवड डॉ. रामरावजी रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रमुख पाहुणे सेलू तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव केदार गजमल, केमिस्ट सदस्य श्री. माणिकराव डख, श्री. प्रेमकुमार चव्हाण, शौकत बागवान, अझहर पठाण, अपूर्वा पॉलिटेक्निकचे उप- प्राचार्य प्रा. गजानन जाधव व प्रा.अक्षय बन आदीं मान्यवर उपस्तीत होते.
या प्रसंगी बोलतांना डॉ.रामराव रोडगे म्हणाले कि, फक्त देशच नव्हे तर जागतिक पातळीवर औषधनिर्मात्यांचे काम व त्यांचे योगदान बहुमूल्य आहे. औषधनिर्माता क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःला अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. आज जे ज्ञान तुम्ही घेत आहात त्या ज्ञानामध्ये तुम्हाला सतत भर घालावी लागेल तरच तुम्ही बाहेर स्पर्धेच्या युगात टिकू शकताल. श्रीराम प्रतिष्ठान जागतिक पातळीचे कुशल औषधनिर्माते आदित्य इंस्टीट्यूट ऑफ फार्मसीच्या माध्यमातून तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच या प्रसंगी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अध्यक्ष या नात्याने श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच श्री. संदीप टाक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक औषधनिर्माता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 55 जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा. अक्षय बन यांनी केले. सूत्रसंचालन कू . कोमल या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन प्रा. महेश कोल्हे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.