आपला जिल्हा

जिंतूरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जिंतूर: २४(प्रतिनिधी ) स्व. गिरीधारीलाल तोष्णीवाल यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त व आयोध्याबाई रामनारायण तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट तसेच उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने तारीख २४ रोजी शहरातील गुरुकुल येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिबिराचे उद्घाटन वेळी व्यासपीठावर महेश चैतन्य महाराज, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काळे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, ॲड.मनोज सारडा, पत्रकार विजय चोरडिया, गोविंदजी पोरवाल, डॉ. सचिन बिललांकर, डॉ. विष्णू पवार, पत्रकार शकील अहमद हे उपस्थित होते. प्रास्ताविकात ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करीत ट्रस्टमार्फत पार पडत असलेल्या मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया व इतर सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक काकडे म्हणाले की, माणसातच देव असतो.मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. तोष्णीवाल परिवाराच्या होत असलेल्या सामाजिक कार्याची स्तुती केली. तर ॲड.सारडा यांनी समाजसेवेचा संकल्प सर्वांनीच करावा.चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने होत असलेल्या कार्याचे कौतुक केले.यावेळी डॉ.पवार,विजय चोरडिया,शकील अहमद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात रुग्णाची तपासणी डॉ. सचिन विलोंकर, डॉ. विष्णू पवार यांनी केली .या शिबिरात १६३ रुग्णाची तपासणी करण्यात आली.त्यापैकी १०७ रुग्णांना उदगीर येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चोपडे तर आभार ज्ञानदेव कुदळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमण तोष्णीवाल, पंकज तोष्णीवाल, सचिन तोष्णीवाल ,गजानन घुगे दिनकर मस्के, राहुल घुगे, दीपक दावलबाजे, गजानन तिखे, मनोहर कदम, स्वप्निल येरमवार, मेघराज मांडवगडे, सुभाष धानोरकर, शिवाजी काकडे, गणेश घुगे, परसराम घंदारे, प्रसाद घुगे, मदन मोरे, प्रकाश खोलगडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!