सेलू ( प्रतिनिधी) सेलू तालुक्यातील दुधना, करपरा व कसुरा नद्यांचे पुनर्रजीवन, खोलीकरण करा मा. ना. राधाकृष्ण विखे जलसंपदा, मंत्री, महाराष्ट्र यांच्याकडे सेलू दबाव गटाच्या वतीने निवेदणाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
सेलू तालुक्यात दुधना, कसूरा व करपरा या महत्वाच्या नदया आहेत. ज्यामध्ये केवळ पावसाळ्यातच पाणी असते. दुधना नदीवर ” लोअर दुधना धरन” बांधण्यात आलेले आहे.उपरोक्त तीन ही नदयांचे लाभक्षेत्रात साधारणतः 20 ते 25 गावांचा सेलू तालुक्यातील समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कमी होणारा पाऊस व बेसुमार वाळू उपसा यामुळे तीन ही नद्यांचे पात्र असमान झालेले आहे. यातील करपरा नदीचे पात्र पाच ठिकाणी आपोआप बदलले असून सर्व नदयांचे पात्र हे अत्यंत उथळ झालेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील या तीन ही नदयांमध्ये पाणी साठा होऊच शकत नाही. त्यात सातत्याने अतिवृष्टी झाली की लगतच्या शेतीचे प्रचंड नुकसान होते. शेतकरी वर्ग अत्यंत परेशान होतो. नाहक नुकसान झाल्याने प्रचंड प्रमाणात त्यांचे परिसरातील शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते.
त्यामुळे या तीन ही नदयांचे खोलीकरण करणे गरजेचे व आवश्यक आहे. त्यामुळे सदर नद्यांचे जवळील गावांना निश्चितच लाभ होणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळीवर वाढण्यास मदत होईल. खोलीकरणासोबत सर्वेक्षण करून बंधारे करण्यात यावे. यासाठी तातडीने पाऊले उचलणे जरूरीचे आहे. ज्यामुळे तालुक्यातील दुधना, करपरा व कसुरा या नदयांच्या क्षेत्रात येणाऱ्या जवळपास 60 ते 70 गावातील शेतकन्यांना लाभ भेटल फायदा होईल. आपण या प्रकरणी तात्काळ सकारात्मक निर्णय करून जनतेस न्याय द्यावा.
-निवेदक-अॅड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चळाळ, गुलाब पौळ. इसाक पटेल, सतिश काकडे, मुकुंद टेकाळे, दिलीप मगर परमेश्वर काढे, दत्ताराव कांगणे, रामचंद्र झाधान, भारत खंदळे अँड. देवराव रकवे अँड. योगेश सुर्यवंशी, अँड. काष्टे नारायण पवार, उदव सोळंके, दिलीप शेवाळे, अजित मंडाडीक – राजेंद्र केवारे राजाभाऊ मोगल, लक्ष्मण प्रधान, गणपत मिटकर – सिंबाजी कालाल, गणेश मुंढे, चंद्रकांत चौधरी, रोफ भाई, – गणेश सोळंके, सुभाष काकडे, आबासाहेब भुजबळ, विकास गादेवार