सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालयाचे सेवानिवृत्त ज्येष्ठ लिपिक गिरीश लोडाया यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी साडेआठ वाजता मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांचे मृत्यू समयी वय 72 वर्षे होते.
त्यांच्या निधनाने सेलू शहरातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात हळ हळ व्यक्त होत असून या क्षेत्रामध्ये ते खूपच हेरिरीने काम करत असत. त्याचबरोबर गणेशोत्सव व्याख्यानमाला चे सचिव म्हणून अनेक वर्षे काम करत होते. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम हा मुंबई येथेच होणार असल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात येत आहे. गिरीश लोढाया यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो अशी भावना नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय परिवारातर्फे व्यक्त केली जात आहे.