आपला जिल्हा

श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

सेलू ( प्रतिनिधी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित प्रॉस्परस पब्लिक स्कूल हिंदी दिवस उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात द्विप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रगती क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. या भाषेबद्दल अनेक मनोरंजक तथ्ये आहेत जी तिला अद्वितीय बनवतात. भारतात हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्याचे पाऊल स्वागतार्ह असले तरी दरवर्षी हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. आपण कुठेही गेलो तरी आपले आदर्श आणि संस्कृती विसरता कामा नये याची आठवण करून देणारा हिंदी दिवस.अशाप्रकारचे मार्गदर्शन डॉ.संजय रोडगे सर यांनी विद्यार्थ्यांना केले.या दिवसा अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,जसे की सुंदर हस्ताक्षर, निबंध लेखन, सलाद सजावट, हस्तकला,1 मिनिट टॅलेंट. नाट्यीका ,विनोद इ. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यांनी अक्षरा चव्हाण व संचीता लहाने केले .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!