सेलू ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान संचालित अपूर्वा पॉलीटेक्नीक येथे सर मोक्षगुन्डम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष्य मा.डॉ.संजय रोडगे यांची प्रमुख उपस्तीथी लाभली.तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे,प्रा.अशोक बोडखे प्रा.अक्षय बन डॉ.मीनाक्षी रत्नपारखी आदींची प्रमुख उपस्तीथी होती.
या प्रसंगी बोलतांना डॉ.संजय रोडगे म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःला अद्यावत ठेवणे गरजेचे आहे.आज जे ज्ञान तुम्ही घेत आहात त्या ज्ञानामध्ये तुम्हाला सतत भर घालावी लागेल तरच तुम्ही बाहेर स्पर्धेच्या युगात टिकू शकताल.पुस्तकी ज्ञानाचा उपयोग जो कृती मधून दाखवतो तो खरा अभियंता.तसेच या प्रसंगी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अध्यक्ष या नात्याने श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत डॉ.संजय रोडगे यांनी केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा.अशोक बोडखे यांनी केले.तसेच सूत्रसंचालन पुष्पांजली या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन प्रा.विष्णू तेथे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अपूर्वा पॉलीटेक्नीक मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.