आपला जिल्हा

अभिरुपा पैंजणे हिने काल नांदेड येथे झालेल्या अंतरमहाविद्यालयीन ज्ञानतिर्थ युवक महोत्सवात शास्त्रीय गायन प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक 

⬛समुहगायन संघास कांस्यपदक, जलसा गानप्रकारात रौप्यपदक 

परभणी ( प्रतिनिधी ) कु.अभिरुपा पैंजणे हिने काल नांदेड येथे झालेल्या अंतरमहाविद्यालयीन ज्ञानतिर्थ युवक महोत्सवात समुहगायन संघास कांस्यपदक, जलसा गानप्रकारात रौप्यपदक तर शास्त्रीय गायन प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.

बाल विद्यामंदिर हायस्कूल, परभणी येथील माजी विद्यार्थीनी आणि श्री.शिवाजी महाविद्यालय, परभणी येथील संगीत विषयात उच्च शिक्षण घेत असलेली विद्यमान विद्यार्थीनी तसेच संगीत व गायन क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित संगीतरत्न श्री रमाकांत पैंजणे सर यांची कन्या आहे.
गेल्या तिन वर्षात युवक महोत्सवात सातत्यपूर्ण कामगिरी करत सुवर्णपदक पटकावण्याची हॅट्रीक मिळवण्याचाही मान तिने पटकावला.
तिच्या या अनमोल यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे, जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी कलाध्यापक संघांचे छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय उपाध्यक्ष श्री.माधव घयाळ, जिल्हाध्यक्ष श्री.केशव लगड,सचिव श्री.अतुल सामाले,कार्याध्यक्ष श्री.शेख जाहेद उमर,परभणी तालुका अध्यक्ष श्री.उद्धव पांचाळ,मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत गरुड,मुख्याध्यापक श्री.दिलीप सोनकवडे यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!