आपला जिल्हा

‘ वक्तृत्वाचा दीपस्तंभ ‘ शालेय वक्त्यांसाठी मार्गदर्शक पुस्तक – अरविंद सगर

वक्तृत्वाचा दीपस्तंभ पुस्तकाचे प्रकाशन

परभणी ( प्रतिनिधी ) सुरेश हिवाळे आणि अनुष्का हिवाळे यांच्या ‘ वक्तृत्वाचा दीपस्तंभ’ या वक्तृत्व, भाषणासाठी मार्गदर्शनपर पुस्तकाचे शहरातील राजगोपालाचारी उद्यानात शनिवार ( दि. ०२ ) सप्टेंबर रोजी औपचारिक प्रकाशन झाले. या प्रसंगी गझलकार अरविंद सगर, त्र्यंबक वडसकर, गंगाधर गायकवाड, माणिक पुरी, प्रा. हनुमान व्हरगुळे, मारोती डोईफोडे, शरद ठाकर, माधव गव्हाणे यांची उपस्थिती होती. गझलकार अरविंद सगर म्हणाले की, ” शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वकृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संहितेची पहिली अडचण असते. ही संहितेची अडचण सुरेश हिवाळे व अनुष्का हिवाळे यांच्या ‘ वक्तृत्वाचा दीपस्तंभ’ या पुस्तकाने दूर होईल. सोबतच शालेय वक्त्यांना वक्तृत्वाची संहिता कशी असावी. याचे मार्गदर्शनही ‘वक्तृत्वाचा दीपस्तंभ’ या पुस्तकातून मिळेल. प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!