आपला जिल्हा

सेलू येथील नियोजित डंपिंग ग्राउंडला निकटच्या नागरीकांचा विरोध

हेमंतराव आढळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मुख्याधिकारी यांची घेतली भेट

सेलू ( प्रतिनिधी ) :- नगर परिषद सेलूने गट नंबर 88, 88/1, 89 परिसरात नियोजित डंपिंग ग्राउंड करण्याचा घाट घातला असुन याला निकट परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे.
या संदर्भात माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मुख्याधिकारी यांची भेट घेऊन या नियोजित डंपिंग ग्राउंड मुळे होणाऱ्या संभावित दुष्परिणामाची जाणिव करुन देऊन या ठिकाणी डंपिंग ग्राउंड न करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यापुर्वीही नागरी वस्तीजवळ डंपिंग ग्राउंड होता, त्या ठिकाणी नगरपरिषदने खनून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एका बालकाचा दुर्देवी मूत्यु झाला होता. त्यानंतर सदरच्या जागेवरचा डंपिंग ग्राउंड हटविण्यात आला होता. वास्तविक डंपिंग ग्राउंडची जागा हदगाव येथे असुन त्या ठिकाणी सेलू नगर परिषदने निधी खर्च करुन जागा विकसित केली होती. आता पुन्हा नव्याने शहरालगत व अरबी मदरसा जवळच नियोजित डंपिंग ग्राउंड करण्याचा प्रयत्न होत आहे. या मुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल तसेच पर्यावरणाचीहि क्षती होईल. करीता डंपिंग ग्राउंड शहरापासून दूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जर का मागणीकडे दुर्लक्ष करुन तेथेच डंपिंग ग्राउंड करण्याचा प्रयत्न झाल्यास नागरीकांतर्फे तिव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती महसुल आयुक्त संभाजीनगर, जिल्हाधिकारी परभणी, उपजिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष हेमंतराव आढळकर, माजी नगरसेवक शेख रहीम भाई, माजी नगरसेवक सय्यद मुश्ताक स. रब्बानी, माजी नगरसेवक विनोद तर्टे, शेख वाजीददादा, पठाण इम्तियाज अली खान, माजी सय्यद कलीम,शेख महेमुद, ॲड. शेख मोहसीन, पठाण नासेर खान, पत्रकार अल्ताफ मास्टर, सय्यद नियाजोद्दिन, पठाण लालू खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!