आपला जिल्हा

पिक नुकसान मदतीसाठी हादगांव बु आणि कासापुरी महसुल मंडळाचा सामावेश करा.

सौ.भावना अनिलराव नखाते यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे मागणी.

परभणी (प्रतिनिधी ) यावर्षी खरीप पेरणीपासुन पावसाने दगा दिला आहे. पाथरी तालुक्यात सर्वत्र सारखी परिस्थिती असतांना पिक नुकसान मदतीसाठी हादगांव बु आणि कासापुरी ही दोन्ही महसूल मंडळ वगळली गेली आहे.पिक नुकसान मदतीसाठी हादगांव बु आणि कासापुरी महसुल मंडळाचा सामावेश करून घ्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते यांनी रविवारी परभणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे.

यावर्षी चांगला पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली.पण त्यानंतर पावसाने दगा दिला आहे.महागामोलाच्या बि – बियाणे, खते ,औषधी असा मोठा खर्च केला.पण पाऊस वेळेत न झाल्याने या पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरी हतबल झाला आहे.तालुक्यात सर्वत्र.सारखीच स्थिती आहे. मात्र शासनाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या पिक नुकसान मदतीमध्ये हादगांव बु आणि कासापुरी हि दोन्ही महसूल मंडळ वगळली आहेत. या भागातील पिकांची नुकसानस्थीती लक्षात घेता पिक नुकसान मदतीसाठी हादगांव बु आणि कासापुरी या दोन्ही महसुल मंडळाचा सामावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांनी शासन आपले दारी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांचेकडे केली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!