सेलू ( प्रतिनिधी ) सेलू ते निपाणी टाकळी रोड (VR-56) कामासाठी महाराष्ट्र शासनाने 49 लक्ष रु. मान्य केले. ज्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे (सब डिव्हीजन जिंतुर ] करण्यात आले आहे.
सदरील कामास प्रशासकीय मान्यता आदेश जिल्हा परिषद बांधकाम विभाग, परभणी तर्फे दि. 4-10-2021 ला काढण्यात आला. सदरील रस्ता हा अत्यंत
महत्वाचा असून शासकीय दवाखान्यालगत आहे. पेशंटला परभणी व इतरत्र हालविण्याचे “असल्यास या रस्त्याने तात्काळ मुख्य महामार्गास जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी जाता येते. मात्र शासनाने मोठ्या प्रमाणात या रस्त्यासाठी निधी दिलेला असताना ही संबंधीत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदाराचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केलेले आहे. मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा गैरवापर झाला आहे. ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट काम, अधिकान्याधी संगनमताने केलेले आहे. आज ही सदर रस्ता वाहतूकीस योग्य नाही. रस्त्याने कोणते ही वाहन जाऊच शकत नाही.
ज्या प्रकारे सदर काम ठेकेदाराने करणे आवश्यक होते. त्या प्रमाणे करण्यात आलेले नाही – काम चालु असताना अधिका-यांनी त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले कसलेही नियंत्रण ठेवले नाही. ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे काम केले आहे. शासकीय निधीचा दुरुपयोग आहे.
या सर्व प्रकाराची समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी. दोषी ठेकेदार, सक्षम अधिकारी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच ठेकेदारांस मंजूरी नुसार काम पुन्हा करण्या बाबत आदेश यावेत.
मा. जिल्हाधिकारी, परभणी यांना दिलेल्या निवेदनावर अँड. श्रीकांत वाईकर ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल नारायण पवार, गुलाव पोळ, रामचंद्र कांबळे, सतिश काकडे, अब्दुल रौफ भाई, लिंबाजी कलाक, दत्तराव कांगण, लक्ष्मण प्रधान, अँड. उमेश काष्टे, प्रमोद कादे, नारायण पवार • उड़द व सोळंके, अॅड. योगेहा सुर्यवंशी, उत्तम गवारे,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.