आपला जिल्हा
निवडणुक कर्मचाऱ्यांनी बॅलेट युनिट चुकीच्या क्रमाने लावाल्याने कार्यवाहीची मागणी
⬛ तहसिलदार मानवत यांना दिले निवेदन

परभणी( प्रतिनिधी ) दि. २६/०४/२०२४ रोज शुक्रवार लोकसभा (परभणी) निवडणुक २०२४ पार पडले. मानवत शहरामध्ये निवडणुक कर्मचारी यांनी चुकीच्या पध्दतीने काम केलेले आहे. बुथ कमांक ६०, ६१, ६२, ६४, ६६, ६९, ७०, ७३, ७८, ७९, ८३, ८४ या १२ (बारा) बुथवर निवडणुक कर्मचारी यांनी बुथवर मशिन एक-दोन-तीन न लावता तीन-दोन-एक अशा चुकीच्या पध्दतीने मशिनी लावण्यात आल्या होत्या. अशा मशिन निदर्शनात आल्यानंतर मतदारांनी त्यावर आक्षेप नोंदविला. त्यानंतर निवडणुक कर्मचारी यांनी वरिष्ठ झोनल अधिकारी प्रा.डॉ. दिगांबर पेरके व सचिन मोरे यांना वोलाविण्यात आले. त्यावेळेस दोन्ही झोनल अधिकारी यांनी मशिन क्रमांक चुकीचा आहे असे कर्मचाऱ्यांना सांगुन मशिनचे क्रमांक १, २, ३ असे करुन घेतले. ह्या सर्व प्रक्रियेसाठी ३ ते ४ तास लागले. त्या दरम्यान मानवत शहरात मतदारामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
उर्वरीत १४ बुथवरील कर्मचारी यांनी प्रशिक्षणानुसार मशिनचे क्रमांक १, २, ३ लावण्यात आली होती. या वुथवर व्यवस्थित मतदान प्रक्रिया पार पडली. तरी मे. साहेबांनी मानवत शहरातील निवडणुक कर्मचारी ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अश्या आशयाचे निवेदन मानवत तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनावर अशोक बुरखुडे , शिवाजी सोरेकर
, शाम चव्हाण, आप्पा भिसे, शेख खुदुस,
, अनिल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
याप्रकरणी न्यूज महाराष्ट्र 36 यांनी मानवत येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना संपर्क साधला असता त्यांनी बॅलेट युनिट क्रमांक बरोबर असल्याचे सांगितले तर फक्त सदरील कर्मचाऱ्यांनी बॅलेट युनिट च्या बाजूला ठेवण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीन दुसऱ्या बाजूने ठेवल्याने तक्रारदारांना तो क्रम चुकीचा वाटला असल्याची माहिती दिली.
बॅलेट युनिट ची वायरिंग ही क्रमबद्ध जोडता येते त्यामुळे त्यात उलट सुलट क्रम लावता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.