आपला जिल्हा
चित्रकलेतून विद्यार्थ्यांनी रेखाटली रम्य पहाट व स्वच्छ व सुंदर गांव.
कल्पना शक्तीला वाव मिळण्यासाठी संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांचे वाढदिवसानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धा.

सेलू (प्रतिनिधी ) : उगवलेला सुर्य,महिलांची स्वच्छतेसह पाणी भरण्यासाठीची लगबग,पक्षाच्या हालचाली,रस्त्यावर व्यायामासाठी फिरणारे नागरीक,गजबजलेला मंदीर परीसर अशी ती रम्य पहाट व स्वच्छतेसह पर्यावरणाचा संदेश असे एकाहून एक सरस कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकल्यांचे हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय चित्रकला व रंगभरण स्पर्धेचं.




