आपला जिल्हा

सेलू-पाथरी रोडवरील ओहरब्रिजला  रवळगावकडे एक वळण रस्ता देण्याची मागणी

सेलू (प्रतिनिधी ) रोजी सेलू-पाथरी रोडवर रेल्वे गेटवरील होत असलेल्या ओलांडी पुल (Overbridge) ला रवळगाव रस्त्याला वळण देणे गरजेचे आहे, असे निवेदन मा. आ. मेघनदिदी बोर्डीकर- साकोरे व उपकार्यकारी अभियंता, सेलू यांना देण्यात आले. त्यावेळी संचालक कृ.उ. बा. समिती सेलू. चे डॉ. संजय रोडगे, ॲड. दत्ताराव कदम, श्री. माऊली ताठे, सरपंच श्री. दिपक रोडगे, श्री. तूकाबापू लहाने, श्री. अशोकराव लिपणे, श्री. दादाभाऊ बोंबले, श्री. सुभाषराव गायकवाड, श्री. रामेश्र्वर गटकळ, श्री. कैलास पवार, श्री. गणेश रोडगे, श्री. गुलाबराव रोडगे, श्री प्रदीप रोडगे, श्री. सुनील रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सेलू तालुक्यातील बाजारपेठेमध्ये भरपूर प्रमाणात मालाची वाहतूक, शाळा/ महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, तालुका आष्टी साठी जाणाऱ्या बसेस, गर्भवती महिलां, आजारी व्यक्तींना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी व इतरही आवश्यक बाबींना रेल्वे गेट लागल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे.
सेलू तालुक्यातील रवळगाव जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व ग्रामपंचायतचे या ओलांडी पुल (Overbridge)ला रवळगावकडे वळणरस्ता देण्यासाठीचे सर्व ग्रामपंचायतचे ठराव देण्यात आले. सर्वांच्या मागण्या लक्षात घेऊन नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सदरील ओलांडी पुल (Overbridge) ला वळणरस्ता देणे आवश्यक आहे.
तरी यावर सर्वसामान्य नागरिक, गर्भवती महिला,शाळकरी विद्यार्थी व आजारी नागरिक यांच्या हिताय निर्णय घेऊन या ओलांडी पुल (Overbridge) ला रवळगावकडे वळण रस्ता देण्याचे निवेदन देण्यात आले. यावर श्री. दीपक रोडगे सरपंच रवळगाव, सौ . स्वाती गटकळ, सरपंच गोहेगाव, श्री. तुकाबापु लहाने, सरपंच आहेर बोरगाव, श्री. अशोकराव लिपने, सरपंच सिद्धनाथ बोरगाव, सौ. प्रियांका दादाभाऊ बोंबले, सरपंच डासाळा, सौ. अश्विनी कैलास पवार, सरपंच शिंदे टाकळी, श्री. माऊली ताठे, सरपंच माले टाकळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!