आपला जिल्हा

व्हाईस ऑफ मीडियाच्या सेलू तालुकाध्यक्षपदी श्रीपाद कुलकर्णी, सरचिटणीसपदी शिवाजी आकात

संघटक नारायण पाटील, कार्याध्यक्षपदी बाबासाहेब हेलसकर

सेलू ( प्रतिनिधी ) जि.परभणी : व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या सेलू तालुकाध्यक्षपदी श्रीपाद कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी बाबासाहेब हेलसकर, तर सरचिटणीस म्हणून शिवाजी आकात यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्या २०२४ या वर्षाच्या कार्यकारिणी निवडीसाठी गुरुवारी, ११ जानेवारी रोजी बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख होते. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, संतोष कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर, उपाध्यक्ष विलास शिंदे, मोहन बोराडे, सरचिटणीस शिवाजी आकात, सहसरचिटणीस बालाजी सोनवणे, कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी-बाहेगव्हाणकर, संघटक नारायण पाटील, कार्यवाहक डॉ.विलास मोरे, प्रसिद्धी प्रमुख रामकिशन कटारे, मार्गदर्शक सदस्य : राम सोनवणे, अशोक अंभोरे, जयचंद खोना तसेच प्रसाद खारकर, पंकज सोनी, शंभू काकडे, पुनमचंद खोना आदींचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, डिजीटल मीडिया तसेच मुक्त पत्रकारिता व अन्य माध्यमातून कार्यरत सर्व पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लागावेत, या उद्देशाने व्हाईस ऑफ मिडिया देशभरात कार्यरत आहे. कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी संघटनेमध्ये तसेच विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी यावेळी केले. गजानन देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. श्रीपाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मोहन बोराडे यांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!