आपला जिल्हा

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या  विद्यार्थ्यांची राजश्री शाहू कॉलेज लातूरसाठी निवड

 सेलू ( प्रतिनिधी ) दि.13 एप्रिल . श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या  विद्यार्थ्यांची राजश्री शाहू कॉलेज लातूर येथे निवड झाली आहे. राजश्री शाहू कॉलेज लातूर येथे स्क्रीनिंग टेस्ट ही परीक्षा झाली होती. यामध्ये भारतातून जवळपास लाखो  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.या परीक्षेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी दरवर्षी यश मिळवतात. यावर्षी वरद विकास कदम या विद्यार्थ्यांने 247 मार्क्स मिळवून आय आय टी बॅच मध्ये प्रवेश मिळवला, रामप्रसाद तुळशीदास काळे या विद्यार्थ्यांने 199 मार्क्स मिळवून आय आय टी(IIT Batch) बॅच साठी प्रवेश मिळवला. तसेच ऋग्वेद जयप्रकाश कीर्तने या विद्यार्थ्याने  197  मार्क्स घेऊन आय आय टी(IIT Batch) बॅच साठी आपले स्थान निश्चित केले. या तीनही विद्यार्थ्यांनी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांच्या यादीत प्रवेश मिळवला आहे.या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलू संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, पर्यवेक्षक अर्जुन गरुड बाजीराव मोगल, रीना ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!