आपला जिल्हा

मतदार नाव नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा तहसीलदार शिवाजी मगर

25 जानेवारी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्त चित्रकला स्पर्धा

सेलू ( प्रतिनिधी ) मतदार नाव नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा व देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी हातभार लावावा असे प्रतिपादन सेलू चे तहसीलदार शिवाजी मगर यांनी शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित मतदान जनजागृती चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. व्यासपीठावर नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील सेलू तहसील कर्मचारी पदाधिकारी, उप मुख्याध्यापक के के देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांची उपस्थिती होती.

भारत निवडणूक आयोगा तर्फे राष्ट्रीय मतदार दिना साजरा करण्यात येतो त्या निमित्त नूतन विद्यालय सेलू येथे मतदान जनजागृती या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस, सदर 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी Nothing like Voting. I Vote For Sure” हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आरडी कटारे कला शिक्षक फुलसिंग गावित यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!