सेलू ( प्रतिनिधी ) येथील डॉ मयूर माणिकराव डख यांनी एम.डी. मेडिसीन या वैद्यकीय क्षेत्रातील पद्यूत्तर परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी आपले एम.डी.चे पदयुत्तर शिक्षण पूर्ण केले. तर एम.बी.बी.एस. हे पदवी शिक्षण मुंबई येथील नायर वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशबद्दल सर्वस्तरातून कौतूक होत आहे.