आपला जिल्हा

गोविंदबाबा मठाच्या 32 एक्कर वर पर्यटन केंद्र व गोशाळेचा विकास करणार – आमदार मेघना बोर्डीकर

सेलू( प्रतिनिधी ) येथील श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या 32 एक्कर जागेवर आकर्षक असे पर्यटन केंद्र उभारूण,गोशाळेच्या विकासासाठी आपण विशेष प्रयत्न करू तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिना निमित्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन आमदार मेघना साकोरे बोरडीकर यांनी दिले.

येथील दादूपंथी मठ गोशाळेत गोसेवा आयोगाच्या वतीने मंजुर करण्यात आलेल्या गोशाळेच्या टिनशेड उभारणीच्या कामाचे भूमिपुजन करताना बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी आमादार बोर्डीकर बोलत होत्या. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. दत्तराव कदम , डॉ. संजय रोडगे , माजी सभापती दिनकर वाघ , गोशाळेचे सदस्य सुरेंद्र तोष्णीवाल, जगन्नाथ पवार , अविनाश बिहाणी, सूर्यकांत जाधव, भाजपा महिला आघाडीच्या रूपालीताई ठाकूर, कपील फुलारी, अजय डासाळकर, कृष्णा काटे, ॲड. कृष्णा शेरे, अनुप गुप्ता, अशोक शेलार आदींची उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचीत आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते गोमातेच्या पुजन करण्यात आले. तसेच गोशाळेच्या वतीने आमदार बोर्डीकर यांचा निवडणूकीतील विजयाबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनारायण मालाणी , गोपुजनाचे पौराहित्य मनोहर महाराज रत्नपारखी यांनी केले. कार्यकृम यशस्वीतेसाठी आनंद सोनी, बबलू दायमा, पापा काबरा, गोविंद शेलार, विजय पांडे आदींनी परिश्रम घेतले.

आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते गोशाळेच्या टिनशेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन चालू असतानाच गोशाळेतील दोन गायींनी दोन नवजात वासरांना जन्म दिला हा योगायोग म्हणजे परभणी जिल्हा च्या विकासासाठी व बोर्डीकरांसाठी शुभ संकेत ठरतील असा आशावाद व्यक्त होत आहे

Related Articles

Back to top button
Don`t copy text!