आपला जिल्हा

इम्रान लातूर व मालेगाव विजयी

राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा -२०२४

नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. 20 जानेवारी 2024 शनिवार रोजी सकाळी
सत्रातील सामना पीडीसीसी परभणी विरुद्ध इम्रान क्रिकेट क्लब लातूर दरम्यान पीडीसीसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक करताना माधव लोकुलवार (उपपोलिस निरीक्षक ) उपस्थित होते.
परभणी संघाने 20 षटकात 158/9 गडी बाद झाले यात अहमद खान 23 सोहिल जिंतूरकर 24धावा, सय्यद मोहिद 24 धावा केल्या.
लातूर संघाच्या वतीने गोलंदाजी करताना सय्यद इम्रान 2 गडी तर सचिन तिवारे 3 गडी, ऋषिकेश फुले 2 गडी गडी बाद केले.
यांचे प्रतिउत्तर देताना लातूर संघाने 19 षटकात 163/4 गडी बाद झाले. सौरभ शेवाळकर 70 नावाने चौफेर फटकेबाजी केली. निशांत पवार 33, आशिष सुर्यवंशी 20 , तेजस तोषलवार 20 धावा करत 6 गडी राखून विजयी झाले.
परभणी संघाच्या वतीने गोलंदाजी करताना शंतनु कदम, नवाज शफीक 2-2- गडी बाद केले.
. सामनावीर पुरस्कार लातूर संघाचे सौरभ शेवाळकर,यास महमुद मौलाना, प्रभाकर सुरवसे, नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ लहाने यांच्या हस्ते देण्यात आला.
दुपारच्या सत्रात विनोद भगत जालना वि. मालेगाव क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान मालेगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 186/7 गडी बाद झाले. यात इम्रान गेएल नाबाद 92 धावांची फटकेबाजी केली. खलिद जमिन 48 धावांची साथ दिली. जालना वतीने गोलंदाजी शेख सलीम,शुभम वर्मा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले ‌.
यांच्या प्रतिउत्तर देताना जालना संघाच्या वतीने 20 षटकार 168/7 गडी बाद झाले यात मनोज दाड यांनी 82 धावांची फटकेबाजी केली. लक्ष्मीनारायण खंडेलवाल 26, ओम राऊत 17 धावांचे योगदान दिले.
मालेगाव च्या भेदक मारा ईशांत राय, सुमाई 2-2 गडी बाद करुन 18 धावांनी सामना जिंकला.
सामनावीर पुरस्कार मालेगाव च्या इम्रान गेएल यास परमेश्वर आकांत यांच्या हस्ते देण्यात आला.

पंच प्रसाद कुलकर्णी, डॉ . मिनानाथ गोमचाळे , शुमाईल गुणलेखक सलमान सिद्दीकी, वैभव सरकटे, माझं अन्सारी तर समालोच, शेख यासेर , शैलेश वाघ,यांनी केले.
अविनाश शेरे, खाजा भाई, संजय लोया, बजरंग घरकुले, विनायक खंडागळे, काळे, बाबा काटकर, संतोष रोडगे, मोहन बोराडे परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!