सेलु ( प्रतिनिधी ) क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी संत जनार्दन मा. व उच्च माध्यमिक विद्यालय चारठाणा येथील वेदांत सराफ या खेळाडुची निवड झाली असून , शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा दिनांक ५ ते ८ नोव्हेबर २०२३ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चव्हाण,नामदेव चव्हाण, रामभाऊ चव्हाण , महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना कोषाध्यक्ष प्रा. पांडुरंग रणमाळ, राज्य टेनिस व्हाॅलिबाॅल सचिव गणेश माळवे, परभणी जिल्हा योगासन संघटनेचे डि डि सोन्नेकर प्रशांत नाईक .संजय भुमकर, मुख्याध्यापक एस .आर.महाजन, क्रिडा विभाग प्रमुख आर एस राठोड, संतोष शिंदे ,जुलाहा खुद्दूस, राजेश राठोड, यांनी शुभेच्छा दिल्या.