आपला जिल्हा
जिंतूर विधानसभा महाविकास आघाडीला धक्का… शिवसेना उबाठा गटाच्या साडेगावकर यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा
⬛आज वंचित बहुजन आघाडीत सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत वालूर येथे भव्य पक्ष प्रवेश

सेलू ( प्रतिनिधी ) शिवसेना (ऊ. बा.ठा) जिल्हाप्रमुख संजय नारायणराव साडेगांवकर यांनी प्रचाराच्या धामधूमीत आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीला धक्का देत आज वंचित बहुजन आघाडीत सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्या सोबत भव्य पक्ष प्रवेश करणार आहेत.
त्यांनी संजयजी जाधव साहेब शिवसेना (ऊ. बा.ठा) उपनेते तथा खासदार परभणी लोकसभा यांना दि 10 नोव्हेंबर रविवार रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात मी संजय नारायणराव साडेगांवकर शिवसेना (ऊ. बा.ठा) जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत आहे, तरि काही कारणास्तव माझी पक्षात काम करण्याची ईच्छा नसल्या कारणाने मी स्वः खुशीने कोणावरही उजर न ठेवता सदरिल पदाचा राजीनामा देत आहे.
तरि आपण माझा राजीनामा स्विकारुन मला पदावरुन कार्यमुक्त करावे हि विनंती.




